- Events /
- आईचे स्मरण -मातृदिन
आईचे स्मरण -मातृदिन
गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता तिसरी दिनकर वर्गाचा ’बैलपोळा व मातृदिन’ या विषयावर विशेष परिपाठ उत्साहात साजरा झाला. भारतीय संस्कृतीत वृक्षांप्रमाणे वन्यजीवांनाही पूजनीय मानले जाते. शेतात वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा हा सण.
परिपाठाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. बैलपोळा हा सण कसा साजरा करतात हे निवेदनातून मुलांनी सांगितले. बैलपोळ्याची पौराणिक कथा नाट्यकरणातून सादर केली गेली. बैलपोळ्यावर आधारित नृत्य मुलांनी जोशात सादर केले. हा सण साजरा होताना बैलाच्या मनातील भावना मिहीरने सांगितल्या.पिठोरी अमावस्येला मातृदिनही साजरा केला जातो, त्याबद्दलची माहिती सांगितली. 'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' हे गीत मुलांनी म्हटले.तसेच आईची महती सांगणारे संस्कृत गीताचे मुलांनी सादरीकरण केले. मा. मुख्याध्यापिका वासंती ताईंनी मुलांचे औक्षण केले. तसेच सर्व तिसरीच्या वर्ग शिक्षकांनी मुलांना ओवाळले.त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आपल्या मनोगतात मा. वासंती ताईंनी परिपाठातील सर्वच मुलांनी उत्तम सादरीकरण केले असे सांगितले. परिपाठाची संहिता वर्गशिक्षिका सौ. राजश्री औटी यांनी लिहिली. परिपाठ पाहायला इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अंकिता निकंबे, रोहिणी कोहिणकर, वरदा पटवर्धन, शुभांगी पानसरे, शमिका देशपांडे या शिक्षिका उपस्थित होत्या. अशाअनेक विशेष परिपाठ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More