प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता शाळेत सर्व विद्यार्थी उत्साहात हजर होते कारण होते गड शिवनेरीचे. सकाळी सव्वा सहा वाजता सर्व विद्यार्थी नऊ बसेस मध्ये बसले आणि शिवनेरीकडे सर्वांनी प्रस्थान केले. उत्साहात घोषणा देत गाणी म्हणत किल्ल्यापर्यंत कधी पोहोचलो हे कळलेच नाही किल्ल्याच्या पायथ्याशी मंगल कार्यालयात नाश्ता देण्यात आला. आता नऊ बसची विभागणी चार बसचा ग्रुप व पाच बसचा ग्रुप अशी झाली होती.एका टीमने आधी चढायला सुरुवात केली तर दुसऱ्या टीमला पहिल्यांदा सर्व माहिती देण्यात आली. विद्यार्थी उत्साहात चढत होते सात दरवाजे ओलांडून सर्वांनी शिवजन्म स्थानाला भेट दिली. मार्गातील अनेक ठिकाणांवर त्यांना स्थानमाहात्म्य व इतिहास कळतच होता. एकापाठोपाठ एक अशा दोन्ही तुकड्या शिवजन्म स्थानाचे दर्शन घेऊन आल्यावर सर्वांचे जेवण झाले.जेवणानंतर विद्यार्थ्यांना एकत्र करून फीडबॅक घेण्यात आला. साधारणतः तीन वाजता सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला वाटेत दहा पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन साडेसात वाजता शाळेत सर्वजण सुखरूप परत आले आणि पालकांना आठवणी सांगत मुले घरी केली मानत मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले सहल खूप छान पार पडली. इन सर्च चे टीम मेंबर्स सहलीच्या व्हाट्सअप ग्रुप वर सातत्याने मुलांचे फोटो जात होते,आपल्या पाल्याचे आनंदी चेहरे बघत सहल छान पार पडत आहे याची खात्री पालकांना होत असल्याने पालकही निश्चिंत होते.पालकांचे बोलके अभिप्राय सहल छान पार पडली याचे दाखले देणारे होते.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स