प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

त्रिवेणी-- विशेष परिपाठ

त्रिवेणी-- विशेष परिपाठ

गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहावीच्या वर्गांचा विशेष परिपाठ सादर झाला. परिपाठात “ हिंदी दिवस, गणेशोत्सव, जल संवर्धन ’ या तीनही महत्त्वाच्या विषयांची गुंफण होती. परिपाठाच्या सुरुवातीला गणेशोत्सवाची माहिती देत त्याचे अलीकडे बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांनी सांगितले आणि गणेशोत्सव कसा असला पाहिजे हेही नमूद केले.

नुकत्याच झालेल्या हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगत हिंदीतून गणेशवंदना व भारत की पहचान हे हिंदी गीत सादर केले. तसेच प्रसिद्ध हिंदी कवी व लेखकांची माहिती सांगितली. यावर्षीचे शाळेचे ध्येय जलसंवर्धन आहे हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी त्यावर आधारित सुंदर नृत्य व पथनाट्य सादर केले. जल ही जीवन है यावर आधारित चित्र मालिकाही विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या रेखाटली होती. कार्यक्रमाची सांगता करताना मुलांनी गणरायाकडे सर्वांसाठी प्रार्थना केली. या परिपाठाचे लेखन व मार्गदर्शन सहावीच्या तिन्ही वर्गशिक्षकांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मा.मुख्या.सौ. वासंती बनकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व शाबासकी दिली. मा. सौ. वासंती बनकर यांच्या सहकार्याने कलागुणांनी नटलेला व सामाजिक संदेश देणारा विशेष परिपाठ उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स