प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रातील देवीच्या नऊ रूपांची माहिती मा स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात दररोज सौ. मिताली पिंपळे यांनी सांगितली.शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते सहावी वर्गांसाठी खंडे नवमी _शस्त्र पूजन व भोंडला या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील रोजच्या वापरातील साधनांची पूजा करण्यात आली होती. वर्गवार मुलांनी या शस्त्रांचे दर्शन घेतले. सौ. मिताली पिंपळे यांनी शस्त्रपूजनाची माहिती सांगितली.

सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशात शाळेमध्ये आले होते. तिसऱ्या तासाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गच्चीवर बसवून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री विकास दिग्रसकर सरांनी भोंडला आणि नवरात्रीची माहिती सांगितली. त्यानंतर सौ .कांचन मांडके यांनी भोंडल्याची पारंपारिक गाणी सांगितली . सर्व मुलींनी आणि शिक्षिकांनी फेर धरून भोंडल्याची भरपूर गाणी गाऊन आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी मिळून गरबा नृत्य केले.शेवटी प्रथेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आणलेला खाऊ एकत्र केला व खिरापत म्हणून कोरडी भेळ सर्व वर्गांमध्ये वाटण्यात आली. या कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापिका सौ. वासंती बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत भोंडला आनंदात संपन्न झाला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स