प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा झाला.या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक (सकाळ व दुपार ) माध्यमिक विभागाच्या सर्व पालक प्रतिनिधीनी एकत्रितपणे नियोजन केले.दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ७ वाजता प्रतिनिधी शाळेत उपस्थित होते. आपल्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने पहिली ते सातवीचे इच्छुक पालक येऊन शिकवतात. एक दिवसाचा शिक्षक होण्याची इच्छा एकूण ६५ पालकांनी दाखविली होती. त्या सर्वांना एकूण २१ वर्गाच्या तासाच्या वेळापत्रकात बसविण्याचे काम श्री आदित्य पुजारी यांनी केले. त्यांना श्री ओंकार जोशींनी साथ दिली.

वेळापत्रकप्रमाणे पहिल्या तासाचे पालक वेळेत येऊन आपापल्या वर्गांवर गेले व सुरु झाला आम्हा पालकांचा एक दिवसाचा शिक्षक म्हणून मिरविण्याचा एक दिवस.एका मागून एक असे ५ तास संपले. सर्व प्रतिनिधींनी आपापसात उत्तम समन्वय साधत शाळा चालवली.प्राथमिक विभागाच्या उपाध्यक्षा सौ. प्राजक्ता गोखले या एक दिवसाच्या मुख्याध्यपिका झाल्या होत्या. त्यांनी अत्यंत जबाबदारीने दिवसभरात कामे मार्गी लावली.शाळेसाठी सर्वात महत्वाची असणारी घंटा वाजविण्याची जबाबदारी श्री. खाडिलकरांनी घेतली होती.

सर्व शिक्षक बनून आलेल्या पालकांची व्यवस्था तळमजल्यावरील जाई व जुई गटात करण्यात आली होती.तेथे सुरुवातीपासून काही प्रतिनिधी जातीने संपूर्ण व्यवस्था पाहत होते. जाई गटातच सर्व शिक्षक बनलेल्या पालकांसाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. त्या दिवशी शाळा सुरळीत चालवण्यात प्रतिनिधींना यश नक्कीच मिळाले.

शाळेनंतर वेळ होती मुख्य कार्यक्रमाची म्हणजेच शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराची.या कार्यकमासाठी आपल्याला श्री. श्रीरामजी चौथाईवाले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर, श्री अमित कुलकर्णी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी कापसे, सौ. प्राजक्ता ओक, सौ अपूर्वा आसनिकर, सौ. मधुरा दामले यांच्या गटाने केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व ईशास्तवनाने झाली.सौ प्राजक्ता गोखले यांनी गायलेले ईशस्तवन ऐकून सभागृहातील सर्वजण मंत्रमुग्ध झाले.त्यानंतर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संक्षिप्त स्वरूपात सांगण्यात आले. यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी त्यांच्या कुटुंबासमवेत कार्यक्रमास हजर होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व अध्यक्षाचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावर्षीचा पूर्वप्राथमिक विभागासाठी दिला जाणारा कै. श्री रवींद्र कृष्णाजी जोशी पुरस्कार सौ. मनाली सचिन मांडके यांना मिळाला. तसेच प्राथमिक विभागासाठी दिला जाणारा कै. गजानन धुंडीराज फडके पुरस्कार सौ. वरदा पटवर्धन यांना मिळाला. आणि माध्यमिक विभागासाठी दिला जाणारा गानू पुरस्कार श्री प्रशांत जाधव यांना देण्यात आला.पुरस्कार प्रदान झाल्यानंतर तीनही पुरस्कारार्थींनी पुरस्कारास उत्तर दिले व स्वतःच्या आनंदाला, भावानांना, अनुभवाला वाट मोकळी करुन दिली.

प्राथमिक विभागाच्या उपाध्यक्षा सौ. प्राजक्ता गोखले यांनी आपले मनोगत थोडक्यात मांडले.त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. श्रीरामजी चौथाईवाले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी त्यांच्या व पूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्या काही आठवणी देखील सांगितल्या. हे ऐकून सर्व सभागृह भारावून गेले.त्यानंतर, कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सर्व उपस्थित शिक्षकांना संबोधले. आणि पुढील काही वर्षात आपण अशा १० गोळवलकर गुरुजी प्रशाला सुरु करूया असा मानस बोलून दाखवला.

सरतेशेवटी, आभार प्रदर्शनाची धुरा सौ. अपूर्वा असानिकर यांनी सांभाळली आणि सौ. प्राजक्ता गोखले यांनी त्यांच्या सुरेल आवाजात पसायदान गायले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.सर्व पालक प्रतिनिधी, शिक्षक, मान्यवर तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी अत्यंत सुरळीतपणे पार पाडली.अशा रितीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत शांततेत,आनंदात पार पडला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स