प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

  माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात मंगळवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीनिमित्त इयत्ता चौथी दिवाकर वर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ उत्तमरित्या सादर केला.
             पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय! या गजराने निवेदकाने( युवान कानिटकर ) कार्यक्रमाला सुरुवात करून आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. वारकऱ्यांच्या भक्तीला तसेच कर्तव्यालाही पूर्ण न्याय कसा दिला जातो याचे यथोचित स्पष्टीकरण दिविजा जोशी हिने  दिले. वेधस प्रभुदेसाई याने एकादशीवर आधारित मृदुमान्य राक्षसाची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली.
         गोष्टीतील भावार्थाला जोडूनच देवई पाटील व देवांश देवळणकर यांनी आषाढी वारी म्हणजे नक्की काय?, महाराष्ट्रात पालखी सोहळा कसा साजरा केला जातो याबाबत  विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. याच निवेदनाला अनुसरून विद्यार्थ्यांनी दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला हे नृत्य सादर केले.
         भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन -पाऊस -वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले जेव्हा पंढरपूरात पोहोचतात तेव्हा त्यांच्या मनात आलेला भाव ईशानी करंबेळकर  या विद्यार्थिनीने सर्वांच्या समोर मांडला. यालाच अनुसरून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, माझी विठू माऊली या नृत्यातून भक्तांच्या मनातील भाव सादर केला.
        यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू सर यांनी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.परिपाठाबाबत मनोगत व्यक्त करताना सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी अतिशय कमी दिवसात अप्रतिम परिपाठ सादर केला,तसेच वर्गशिक्षिका स्मिता नाईकडे व दिवाकर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे परिपाठाबद्दल कौतुक.
             यानंतर लावण्या देशपांडे  हिने मुख्याध्यापक लागू सरांचे,सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी,मावशी,काका, व मित्र-मैत्रिणींचे मनापासून आभार मानले.
            या परिपाठाचे संहितालेखन स्मिता नाईकडे यांनी केले होते.
             इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फरशीच्या मैदानावर गजर करत वारीचा आनंद लुटला. तसेच इयत्ता तिसरी,चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिराला भेट देऊन पालखी सोहळा अनुभवला . वरदा पटवर्धन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पालखीचे गाणे व गजर घेतला. अशापद्धतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स