- Events /
- आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आपल्या प्रशालेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आरोग्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि योगविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
सकाळी ठीक ७.३० वाजता विद्यालयाच्या भव्य प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. वासंती बनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी व योगमार्गदर्शक म्हणून योगगुरू मनिषा भालेराव उपस्थित होत्या. यावेळी मनिषा भालेराव यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करताना पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, पद्मासन आदी विविध योगासने अत्यंत सोप्या आणि आकर्षक पद्धतीने शिकवली. तसेच प्राणायाम व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून त्यांचे महत्त्वदेखील समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त मार्ग असल्याचं सांगितलं. या सामूहिक योगाभ्यासात तब्बल ७५० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, उत्साही आणि मनःपूर्वक सहभाग नोंदविला. योगाभ्यासामुळे संपूर्ण परिसर आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी योग दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, दररोज किमान २० मिनिटे योगाभ्यास करण्याचा दृढ संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक सुभाष निंबाळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय निलेश देवरे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी प्रभावीपणे केले. दीप्ती यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून क्रीडा शिक्षक निलेश देवरे यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली. योगाच्या माध्यमातून ‘निरोगी शरीरातच निरोगी मन वसते’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा दिवस संस्मरणीय ठरला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More