- Events /
- भावभक्ती व संस्कारांची शिकवण – आषाढी एकादशी परिपाठ
भावभक्ती व संस्कारांची शिकवण – आषाढी एकादशी परिपाठ
दिनांक ७ जुलै २०२५, वार सोमवार रोजी इयत्ता चौथी सविता वर्गाने आषाढी एकादशी हा विशेष परिपाठ सादर केला. परिपाठाचे निवेदन शांभवी चिमणपुरे,आयुष मोडक,मिहीर क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी केले. विआन तांबेने आषाढी एकादशीची माहिती सांगून परिपाठाची सुरुवात केली. यानंतर विठ्ठलाचे वर्णन करणारे विठ्ठल गीत सादर केले. सावनी पित्रे,वरद देव, शौर्य गायकवाड या विद्यार्थ्यांनी संत जनाबाई, संत सावतामाळी,संत चोखामेळा यांची वेशभूषा करून माहितीचे सादरीकरण केले. परिपाठाची सांगता विठुरायाच्या भजनात रमलेल्या वारकऱ्यांची वेशभूषा करून 'देह विठ्ठल' या गीतावर नृत्य सादर करून करण्यात आली. मा.मुख्या.श्री.प्रसाद लागू सरांनी परिपाठाविषयी अभिप्राय देताना ' सर्व विद्यार्थ्यांचे व सोनिया तांबेकर,स्मिता नाईकडे,शुभांगी पानसरे या तिन्ही ताईंचे कौतुक केले. परिपाठ उत्तम झाला असे त्यांनी प्रतिपादन केले. दररोज शाळेत होणाऱ्या ओंकार व ध्यानधारणा हे मनापासून करण्याचे फायदे, महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे विद्यार्थ्यांना सांगितले. यासाठी ओंकार व ध्यानधारणा मनापासून करा असे सरांनी सांगितले.' अद्विक जोशी याने आभार मानले. या परिपाठाचे नियोजन व संहिता लेखन सोनिया तांबेकर यांनी केले.अशाप्रकारे मा. मुख्या.श्री. प्रसाद लागू यांच्या मार्गदर्शनामुळे परिपाठ उत्साहात व आनंदात पार पडला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More