- Events /
- बालसभा
बालसभा
दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी 'व 'अण्णाभाऊ साठे जयंती'निमित्त इयत्ता चौथी सविता वर्गाने 'बालसभा 'सादर केली.
वर्गातील रावी पागे ही विद्यार्थिनी अध्यक्षस्थानी होती. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.लागू सर उपस्थित होते. सिनेकलाकार मिलिंद शिंत्रेही उपस्थित होते.
बालसभेचे सूत्रसंचालन अद्विका शिंदे व अंशुल पाटील या विद्यार्थ्यांनी केले.सभेची सुरुवात 'ओंकार प्रधान' या ईशस्तवनाने झाली. रेवा गोंधळी हिने अध्यक्षांचा परिचय करून दिला.यानंतर टिळकांची माहिती, गणेशोत्सव सुरू करण्यामागे टिळकांची उद्दिष्टे व हेतू तसेच या काळात लोकमान्य टिळक असते तर त्यांनी विद्यार्थ्यांशी काय संवाद साधला असता,या सर्व गोष्टींची एकत्रित गुंफण करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. कणाद जोशी याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी 'दिसता तुम्ही आजोबा' टिळकांवर आधारित समूहगीत सादर केले. श्लोक धर्माधिकारी याने 'टिळकांची विनोद बुद्धी' यावर आधारित गोष्ट सांगितली. आभार स्पृहा शहा हिने मानले.
अध्यक्ष संवादात रावी पागे हिने लोकमान्य टिळकांच्या अनेक गोष्टींद्वारे आपण कसे वागले पाहिजे, त्यांचे गुण, आपले विद्यार्थी दशेतील असलेले कर्तव्य याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लागू सरांनी विद्यार्थ्यांचे तसेच चौथीच्या सर्व ताईंचे कौतुक केले. "बालसभेतील विचार समजून घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा "असे सांगितले,तसेच गणेशोत्सवातील मिरवणुकीत अनेक ठिकाणी डीजे लावले जातात त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून अशा मिरवणुकींमध्ये सहभागी न होता घरी राहिलात तर प्रशासनावरील ताण कमी होईलच पण शारीरिक त्रासही कमी होईल म्हणून अशा मिरवणुकीत सहभागी होऊ नका' असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
बालसभेकरिता इयत्ता चौथीचे सविता, पूषण व दिवाकर वर्गाचे विद्यार्थी तसेच शिक्षिक स्मिताताई नाईकडे, रोहिणी पलांडे, श्वेता उंडे, विकास दिग्रसकर आदी उपस्थित होते. या सभेचे नियोजन व संहिता लेखन सौ. सोनिया तांबेकर यांनी केले होते. अशाप्रकारे बालसभा उत्तम सादरीकरणाने संपन्न झाली.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More