- Events /
- बुद्धिचा अधिपति -गणपती
बुद्धिचा अधिपति -गणपती
वक्रतुंण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा
शुक्रवार, दि. २३/०९/२०२६ रोजी इयत्ता दुसरी प्रभाकर वर्गाने ‘गणेशोत्सव’ या विषयावर विशेष परिपाठ सादर केला. परिपाठाची सुरुवात गणेश वंदना सादर करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गणपतीस्तोत्र आणि गणेशोत्सवाविषयी माहिती सुंदर पद्धतीने सादर केली.गणेशोत्सवाचे महत्त्व, गणपतीची विविध नावे, गौरीपूजन, ऋषिपंचमी तसेच पुण्यातील मानाचे पाच गणपती यांची माहिती विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आली. मोदक, दूर्वा आणि जास्वंदाचे फूल गणपतीला का अर्पण केले जाते, यासंदर्भात माहिती सांगितली.परिपाठामध्ये गजानना गजानना हे सुंदर नृत्य सादर केले तसेच गणेशोत्सवामध्ये होणारे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण आणि निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत जनजागृती केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा, हे संवादातून सादरीकरण करण्यात आले.
‘चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले संस्कार हेच गणरायाचे खरे आशिर्वाद आहेत’ हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांनी दिला. संपूर्ण परिपाठ उत्साहपूर्ण, माहितीपूर्ण आणि संस्कारक्षम असा झाला.
परिपाठ उत्तम पद्धतीने सादर केल्याबद्दल मा.मुख्याध्यापिका सौ.वासंती बनकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा असे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. परिपाठाचे संहिता लेखनयोगिता शिंदे यांनी केले तसेच श्वेतांबरी बोध,स्नेहा खटावकर व प्राजक्ता बेंद्रे यांचे परिपाठासाठी मोलाचे सहकार्य लाभले.परिपाठ पाहण्यासाठी इयत्ता दुसरी मित्र व भानू वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारे इयत्ता दुसरी प्रभाकर वर्गाचा विशेष परिपाठ मा.मुख्याध्यापिका सौ.वासंती बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More