प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • गुरुपौर्णिमा विशेष : संस्कारमय परिपाठाची सादरीकरण

गुरुपौर्णिमा विशेष : संस्कारमय परिपाठाची सादरीकरण

गुरुपौर्णिमा विशेष : संस्कारमय परिपाठाची सादरीकरण

दिनांक ११ जुलै २०२५, वार शुक्रवार रोजी इयत्ता चौथी पूषण वर्गाने 'गुरुपौर्णिमा' हा विशेष परिपाठ सादर केला. परिपाठाचे निवेदन काही विद्यार्थ्यांनी संवाद रूपात  केले. सर्व मुलांनी श्लोकातून गुरुवंदन करून परिपाठाची मंगलमय वातावरणात सुरुवात केली. यानंतर गुरु भजन सादर करण्यात आले. संवादातून मुलांनी गुरुपौर्णिमा या सणाचे महत्त्व पटवून दिले. या दिवशी गुरुपौर्णिमा कशा प्रकारे साजरी करावी, त्या दिवशी काय करावे याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर गुरु शिष्यांची गोष्ट सांगण्यात आली.परिपाठाची सांगता गुरूंची महती सांगणारे 'भेटला विठ्ठल' या गीतावर नृत्य सादर करून करण्यात आली. गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी योग्य आचरण करण्याची प्रतिज्ञा घेतली. मा.मुख्या.श्री.प्रसाद लागू सरांनी  परिपाठाविषयी अभिप्राय देताना सर्व विद्यार्थ्यांचे व सोनिया तांबेकर,स्मिता नाईकडे,शुभांगी पानसरे या तिन्ही ताईंचे कौतुक केले. आजचा परिपाठ खूपच नाविन्यपूर्ण होता. त्यातून बरेच काही शिकता येण्यासारखे होते. परिपाठातील प्रतिज्ञा मुलांनी आचरणात आणावी यासाठी मा . मुख्याध्यापक श्री लागू सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. व परिपाठ उत्तम झाला असे प्रतिपादन केले.' निधी देशपांडे हिने आभार मानले. या परिपाठाचे नियोजन व संहिता लेखन शुभांगी पानसरे यांनी केले.अशाप्रकारे मा. मुख्या.श्री. प्रसाद लागू यांच्या मार्गदर्शनामुळे  परिपाठ उत्साहात व आनंदात पार पडला. 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स