- Events /
- गोविंदा रे गोपाळा -आनंद व उत्साह यांचा संगम
गोविंदा रे गोपाळा -आनंद व उत्साह यांचा संगम
गोपाळकाला
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील दुपार सत्रातील इ . ६वी कोयना या वर्गातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि.4 सप्टेंबर 2026 या दिवशी "गोपाळकाला" परिपाठ सादर केला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वासंती बनकर या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवनाने झाली. कृष्णजन्म, कृष्ण- सुदामा मैत्री अशा कथा विद्यार्थ्यांनी सांगितल्या.सुरेल गीते सादर केली. नाटिकेच्या माध्यमातून कृष्णाचा संदेश, मुलींचे नृत्य"अशा कार्यक्रमांचा परिपाठात समावेश होता. शेवटी"गोविंदा रे गोपाळा"या गीतावर मुलांनी नृत्य सादर करत हंडी फोडली.
मुलांनी उत्तम सादरीकरण केल्याबद्दल जेष्ठ शिक्षक श्री. विकास दिग्रसकर यांनी मुलांचे कौतुक केले. एक कृष्ण कथा सांगितली. रीधीमा तागुंदे या विद्यार्थिनीने आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग जोशी व श्रीहरी टेंबे या विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर श्रावणी शुक्रवारनिमित्त वर्गा -वर्गातून शिक्षिकांनी मुलांना औक्षण केले.शेंगदाणे व फुटाणे यांचा प्रसाद दिला.परिपाठासाठी वर्गशिक्षिका सौ. मंजिरी पारुंडेकर यांनी मार्गदर्शन केले व नृत्य दिग्दर्शन विद्यालयातील शिक्षिका सौ.प्राजक्ता बेंद्रे व तन्वी गांधी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वासंती बनकर यांनी नियोजन व मार्गदर्शन केले. भगवान गोपाळकृष्णाच्या जयघोषात हा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More