प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • इयत्ता पाचवी ते सातवी ची सहल प्रथमेश रिसॉर्ट

इयत्ता पाचवी ते सातवी ची सहल प्रथमेश रिसॉर्ट

इयत्ता पाचवी ते सातवी ची सहल प्रथमेश रिसॉर्ट

 बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी इयत्ता पाचवी ते सातवी ची सहल प्रथमेश रिसॉर्ट खेड-शिवापुर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एकूण २२८ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी ८:०० वाजता गाड्या प्रथमेश रिसॉर्टकडे रवाना झाल्या. बरोबर साडेनऊ वाजता प्रथमेश रिसॉर्टला गाड्या पोहोचल्या. आल्या आल्या मुलांचे स्वागत करण्यात आले. त्यांना न्याहारी देण्यात आली. 

 न्याहारीचा आस्वाद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. एडवेंचर गेम्स, बुलक  कार राइड, इतर खेळ,जादूचे प्रयोग, बैठे खेळ आणि त्यानंतर टॅटू. त्यानंतर विद्यार्थ्यांना नाचायला देखील मिळालं. विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.  दुपारी १:०० वाजता जेवण सुरू झाली . इयत्तेप्रमाणे एकेका गटाला जेवायला सोडण्यात आले. जेवण उत्तम होते. विद्यार्थ्यांनी जेवणाचा मनापासून आनंद घेतला. आपल्या हातावर वेगवेगळ्या आकारांचे टॅटू काढताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते. टॅटूची चित्र हातावर बघून विद्यार्थी आनंदून गेले होते.  या सहलीसाठी एकूण ९ शिक्षक आणि एक शिपाई काका आलेले होते. 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स