- Events /
- जागतिक योगदिन व संगीतदिन साजरा
जागतिक योगदिन व संगीतदिन साजरा
दिनांक २१ जून २०२५रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात प्रसन्न अशा परिपाठाने करण्यात आली .यावेळी संगीत शिक्षिका वरदा पटवर्धन यांनी जागतिक योगदिन तसेच संगीत दिना विषयी माहिती सांगितली .प्रशालेचे मुख्याध्यापक मा. प्रसाद लागू सर यांनी योग दिनाचे व योग साधनेचे महत्त्व सांगत सर्व विद्यार्थ्यांची संवाद साधला.
यानंतर इयत्ता दुसरी ते सातवी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्राणायाम ,ओंकार, भ्रामरी तसेच आसनांचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यावेळी प्रत्येक आसन ,त्याचे नाव, त्याचा अर्थ, त्याचे शरीराला होणारे उपयोग याबाबतीत सविस्तर माहिती सांगण्यात आली . त्यामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक परिणाम व मिळणाऱ्या मन:शांती बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर नियमित योगासने करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी इयत्ता चौथी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले.
यावेळी निरोगी शरीर म्हणजे काय व निरोगी राहण्यासाठी काय काय करणे आवश्यक आहे या विषयावर मुलांशी चर्चा करण्यात आली.प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू सर यांचे मार्गदर्शन लाभले. अशा पद्धतीने कृतीयुक्त तसेच विचारांची देवाणघेवाण घेत, निरोगी राहण्याचा संकल्प करत अत्यंत उत्साहाने प्रशालेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More