- Events /
- कब बुलबुल शिबीर
कब बुलबुल शिबीर
सहकार्यातून मजा घेऊनी, अभ्यास- सरावाला क्षणभर थांबूनी!
शिबिरातून नवीन मूल्य अंगीकारुनी,
आनंदूनी जाई गोळवलकर विद्यालयाची भूमी!.......
या विचारांची अनुभूती देण्याच्या दृष्टिकोनातून बुधवार दि. २६ मार्च २०२५ रोजी गोळवलकर गुरुजी विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कब बुलबुलचे शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना, झेंडावंदन, झेंडा गीत, कब-बुलबुल वचनाने झाली. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांमधील गटप्रवृत्ती वाढण्यासाठी तसेच कल्पनाशक्तीला वाव मिळण्यासाठी प्रामुख्याने चित्रकला, हस्तकला, विविध प्रकारचे खेळ,खजिना शोधणे, याचबरोबर कोपरा सजावट / वर्ग सजावट अशा विविध उपक्रमांतून आपल्या गटातील एकतेतून कला सादर केली. प्रत्येक वर्गातील पाच गटांतून प्रत्येक उपक्रमासाठी एक गट विजयी घोषित करून त्यांना प्रोत्साहन म्हणून कब बुलबुल वचनाचे बुकमार्क बक्षीस म्हणून गटासाठी देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी खाऊ म्हणून भेळ, चिक्की व बटरस्कॉच आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन शिबिराची सांगता झाली. प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री.प्रसाद लागू सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शिबीर उत्तम रीतीने पार पडले.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More