प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • पालकशाळा

पालकशाळा

पालकशाळा

शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या पालकांची पालक शाळा घेण्यात आली.
 विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू  मानून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबवण्यासाठी  संस्थेतील पदाधिकारी, शाला समिती अध्यक्ष व सदस्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांची अमूल्य अशी साथ लाभते. या दुहेरी संगमातूनच आदर्श नागरिक व उत्तम विद्यार्थी घडवण्याचा संस्थेचा व शाळेचा वारसा जपला जातो. अशाच अनेक उपक्रमांपैकी एक अत्यंत आगळावेगळा व पालकांचा आवडता असा उपक्रम म्हणजे पालक शाळा!
  पालक शाळेची सुरुवात एकत्रितपणे फरशीच्या मैदानावर प्रार्थना व परिपाठाने करण्यात आली.
यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.प्रसाद लागू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करत असताना मा. लागू सरांनी आजूबाजूच्या बाहेर समाजाचे बदलणारे गंभीर रूप, त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे गंभीर परिणाम आणि पालक शाळा व शाळेतील प्रत्येक घटक यांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले.
आपल्याच प्रशालेतील माजी विद्यार्थी चि. पुष्कर कुलकर्णी यांनी  स्वा. सावरकर यांचे जीवनचरित्र्य उलगडणारी कलाकृती 'अनादी मी! 'अनंत मी! या नाटकाच्या प्रयोगाबद्दल माहिती दिली.
यानंतर प्रशालेतल्या संगीत शिक्षिका प्राजक्ता बेंद्रे यांनी देशभक्तीपर गीत पालकांकडून गाऊन घेतले. खेळाचे शिक्षक निलेश देवरे यांच्या सूचनेनुसार पालकांनी  तालबद्ध कवायत प्रकार केले.
पालक शाळेच्या या औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता निकंबे यांनी केले.
यानंतर सर्व पालकांची आपापल्या इयत्तेच्या वर्गांमध्ये पालक शाळा झाली. पालक शाळेमध्ये शिक्षकांनी विषयांचे अध्यापन कसे केले जाते याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. पालकांकडून काही ऍक्टिव्हिटी करून घेतल्या. विषयांमधील काही महत्त्वाच्या संकल्पना पालकांना समजावून सांगितल्या. यातून पालकांना घरी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन मिळाले. शिक्षण पद्धतीत, अभ्यासक्रमात झालेले बदल लक्षात आले.
पालकांनी देखील पुन्हा एकदा लहान होऊन या पालक शाळेचा आनंद घेतला. पालक शाळेच्या  नियोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.   पालक मोठ्या संख्येने या पालक शाळेला उपस्थित राहिले होते. पालक शाळेची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.
अत्यंत उत्साही, आनंदी, खेळीमेळीच्या व शिस्तबद्ध पद्धतीने पालक शाळा संपन्न झाली.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स