- Events /
- रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा
शुक्रवार,दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालयात रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या विषयावर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ सादर केला. या परिपाठाचे संपूर्ण सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या सणांचे महत्त्व सांगणारी माहिती सादर केली .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विषयाला साजेशी गाणी,गोष्टी,आकर्षक नृत्य ,भावपूर्ण काव्यवाचन ,तसेच सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे आणि सैनिकांना राख्या बांधण्याच्या भावनेवर आधारित हृदयस्पर्शी नाटक सादर केले. सर्व सादरी करणे उत्कृष्ट व प्रेरणादायी होती.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापक श्री. प्रसाद लागू सर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे आणि इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक श्री. लागू सर यांनी शाबासकी दिली. अशा पद्धतीने इयत्ता पाचवीचा विशेष परिपाठ उत्साहात शाळेत संपन्न झाला.
शनिवार,दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी प्रशालेमध्ये वर्गातील विद्यार्थ्यांनी एकमेकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षिका सौ.श्वेतांबरी ताई यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमे विषयी माहिती सांगितली. इयत्ता चौथी मधील काही विद्यार्थ्यांनी बहिण- भावाच्या नात्यासंबंधी भरजरी ग पितांबर हे गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी माननीय मुख्याध्यापिका सौ वासंती बनकर यांनी मार्गदर्शन केले. अशाप्रकारे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रशालेमध्ये दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More