प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • ऋतु बदलाचे-उमलते वय

ऋतु बदलाचे-उमलते वय

ऋतु बदलाचे-उमलते वय

दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी आयुर्वेद व्यासपीठ पुणे -पिंपरी चिंचवड, यांच्या समन्वयाने माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय , टिळक रोड,पुणे,येथे इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थिनींसाठी ‘कळी उमलताना’ व विद्यार्थ्यांसाठी “वयात येताना “ या दोन स्वतंत्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.सदर उपक्रमामध्ये वैद्य उल्का फडके यांनी मुलींना व वैद्य धनंजय इंचेकर आणि वैद्य शशांक करंबेळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास ६ वी व ७ वी चे विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी स्तवनाने करण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मुलींना मासिक पाळीच्या कालावधीतील स्वच्छता व आरोग्यविषयक काळजी, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनीं आणि विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध प्रश्न उपस्थित केले व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

उपक्रमास विद्यालयातील शिक्षकवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला. विद्यार्थ्यांमध्ये किशोरावस्थेशी संबंधित आरोग्यविषयक योग्य माहिती व जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम उपयुक्त ठरला.मुलांचा प्रतिसाद पाहून पुढील सत्रामध्ये पुन्हा एकदा व्याख्यान ठेवण्याबाबत शाळेकडून विनंती करण्यात आली व या स्तुत्य उपक्रमा बद्दल आयुर्वेद व्यासपीठाचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स