प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • सह्याद्रीची रानवाट-ताम्हिणी

सह्याद्रीची रानवाट-ताम्हिणी

सह्याद्रीची रानवाट-ताम्हिणी

मुलांना निसर्ग शिक्षण मिळावे,निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी आपली शाळा ट्रेल आयोजित करते.इनसर्च आऊटडोअर्सतर्फे यावर्षी तो ताम्हिणी येथे नेण्यात आला.शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तिसरी, चौथीचे सकाळ व दुपार सत्रातील एकूण २८६ विद्यार्थी प्रसन्न,उत्साही वातावरणात सकाळी ६ वाजता शाळेत आले.हजेरी घेऊन ६.३९ ला शाळेतून निघालो. गाडीत मुलांनी मनसोक्त कविता, गाणी म्हटली.नाच केला.बरोबर आणलेला खाऊ खाल्ला. वाटेत झालेल्या अपघातामुळे ताम्हिणी येथे पोहोचायला नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीर झाला होता. तेथे पोहोचल्यावर मुलांनी सरबत,पोहे, बटाटेवडे खाल्ले.त्यांचे वर्गांप्रमाणे ग्रुप तयार करण्यात आले. विंझाई देवीच्या परिसरात वड,पिंपळाच्या सावलीत ताई, दादांनी त्यांना ताम्हण फूल,देवराई,फुलपाखरांचे प्रकार,विविध वनस्पती, वेली,घरे,भातशेती,अभयारण्य यांची माहिती दिली.त्यानंतर शेताच्या बांधावरून चालत मुले विळा नदीच्या ओढ्यात मनसोक्त पोहली.पाण्यात मज्जा,मस्ती केली. काही जणांनी ताई दादांच्या देखरेखीखाली पाण्यात उड्या मारल्या. दोन तास पाण्यात खेळून झाल्यावर मुलांना बाहेर आणले.कपडे बदलून पुरी, छोले,गुलाबजाम भात,वरण, पापड असा गरम जेवणाचा मुलांनी आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर थोडावेळ मुलांचे गट करून खेळ घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा मुलांचे एकत्रिकरण करून ओंकार साधना घेतली, मुलांनी, शिक्षकांनी दिवसभराचे अनुभव सांगितले.५ वाजता ताम्हिणीला निरोप देऊन निघालो.गाडीत मुलांना खाऊ दिला.शाळेत संध्याकाळी ७ वाजता सुखरूप पोहोचलो. अशाप्रकारे ताम्हिणी ट्रेलचा सुंदर, अविस्मरणीय अनुभव मुलांना मिळाला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स