- Events /
- संस्थापक दिन
संस्थापक दिन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणारे थोर संस्कृत पंडित, शिक्षणतज्ञ श्री.वामन शिवराम आपटे यांचा स्मृतिदिन 9 ऑगस्ट हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व संस्थापक सदस्य यांचे स्मरण करताना संस्थेतर्फे सर्व गुणवंतांचा गौरव देखील या दिवशी केला जातो. नऊ ऑगस्ट या दिवसाचे औचित्य साधून मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या तीन विभागांनी एकत्रितरित्या शनिवार आठ ऑगस्ट रोजी संस्थापक दिन साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालासमिती सदस्या डॉ. सौ. प्रीती अभ्यंकर यांनी भूषविले. मंचावर अध्यक्षांसोबत तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रस्तावनेतून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद लागू यांनी संस्थापक दिनाच्या निमित्ताने संस्थापक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
डॉ. प्रीती अभ्यंकर यांनी सर्व गुणवंतांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थापकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना वयाच्या कोणत्या टप्प्यावर केली त्यामागील उद्देश व कार्य हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या या वेगवान जगात आपल्या शाळेचे नाव आदराने घेतले जाते ही आपल्याला अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्यांचा संस्थेचे मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच खेळात राज्यस्तरीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि शैक्षणिक पात्रता वाढविणाऱ्या शिक्षकांचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला.मंचावर सर्वांनी शिक्षण विवेक अंकाचे उद्घाटन केले. या सर्व समारंभाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रिया जोशी व आभाराची जबाबदारी रूपाली जोशी यांनी सांभाळली तर गुणवंत विद्यार्थ्यांचे यादीवाचन सोनिया तांबेकर यांनी केले.. कार्यक्रम संस्थेच्या नावाला साजेसा नेटका पार पडला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More