प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन

७८ वा स्वातंत्र्य दिन माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला.    प्रारंभी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शिष्यवृत्ती मिळालेले इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी व दहावीच्या शालेय परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद कांबळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने आदी उपस्थित होते. शाळा समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी असेच प्रयत्न करा, असा संदेश दिला. इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जिवंत कोरस सादर केला. सूत्रसंचालन करताना स्मिता नाईकडे म्हणाल्या की, आपल्या देशाला विकसनशील देशातून विकसित देशात नेण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण 'वंदे मातरम्' ने झाली. 

 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स