प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शिक्षक दिन

शिक्षक दिन

शिक्षक दिन

डे. ए. सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात पालक शिक्षक संघातर्फे गुरुवार ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'शिक्षक दिनाचे' आयोजन करण्यात आले होते. माजी राष्ट्रपती मा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.श्री राजेश पांडे ,अध्यक्ष मा. श्री. मिलिंद कांबळे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.अपर्णा साने, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ. वासंती बनकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.नेत्रा क्षीरसागर, श्री.वैभव जोशी,पालक शिक्षक सदस्य व फडके व जोशी कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सौ .पूर्वा कुलकर्णी - पाच्छापूरकर यांनी ईशस्तवनाने केली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक सौ.नेत्रा क्षीरसागर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. अंजली खमितकर यांनी करून दिला. पूर्व नियोजन करून इच्छुक पालकांनी वेळापत्रक तयार करून,योग्य तो विषय घेऊन त्याची तयारी करून अध्यापनाचाही अनुभव घेतला. सकाळपासूनच योजनाबद्ध पद्धतीने काम केले. विद्यार्थ्यांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. 

'चला व्यक्त होऊया' या कार्यक्रमांतर्गत विविध विषयांवर शिक्षकांना आपली मते मांडण्याची संधी या कार्यक्रमातून दिली गेली. यामध्ये वैयक्तिक तसेच धार्मिक अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि शिक्षकांनी आपल्या विचारांना मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर मा.श्री राजेश पांडे यांच्या हस्ते प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू यांना कै. गजानन धोंडीराज फडके स्मृती "गुणवंत शिक्षक" पुरस्कार तर पूर्व प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. वर्षा बागडे यांना 'कै. रवींद्र कृष्णाजी जोशी आदर्श शिक्षक पुरस्काराने" गौरविण्यात आले. मा.श्री.लागू सरांच्या कार्याचा परिचय श्री. विकास दिग्रसकर यांनी तर सौ. बागडे यांचा परिचय सौ. मनाली मांडके यांनी करून दिला. 

 पुरस्कारास उत्तर देताना हा पुरस्कार हा लेखनिक, काका, मावशी , शिक्षक या सर्वांचा आहे अशा भावना व्यक्त करून सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री. मिलिंद कांबळे यांनी शाळेचा इतिहास उलगडून दाखवला व शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या हातून चांगले कार्य घडो अशा पद्धतीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख अतिथी मा. श्री. राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

आभार प्रदर्शन पालक शिक्षक संघाचे श्री.वैभव जोशी यांनी केले .सौ. भक्ती पागे यांनी गायलेल्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स