प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शाळेत प्रकल्पदिनानिमित्त विद्यार्थ्यांची विज्ञान व शैक्षणिक सादरीकरणे

शाळेत प्रकल्पदिनानिमित्त विद्यार्थ्यांची विज्ञान व शैक्षणिक सादरीकरणे

शाळेत प्रकल्पदिनानिमित्त विद्यार्थ्यांची विज्ञान व शैक्षणिक सादरीकरणे

     शनिवार दिनांक २२नोव्हेंबर २०२५रोजी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प दिन साजरा झाला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तयार केलेल्या मराठी व इंग्रजी उपक्रमांतील चित्रवर्णनांचे सादरीकरण केले.गणिताचे खेळ सादर केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील चित्र पुस्तिकांचे सादरीकरण, गणित व इंग्रजी विषयांतील शैक्षणिक खेळांचे सादरीकरण केले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी खेळातून विज्ञानांतर्गत छोटे छोटे प्रयोग सादर केले. दुसरी ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतर्गत टाकाऊपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूंची मांडणी केली. 

इ. पहिली ते चौथीच्या  प्रकल्प दिनाचे उद्घाटन श्री. किशोर धुमक यांच्या हस्ते तर पाचवी ते सातवीचे उद्घाटन श्री. अभय पुंड यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पना प्रयोगातून सादर केल्या.विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या प्रयोग स्पष्ट केले.काही विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले तर काहींनी चित्रांतून विज्ञान दिन रेखाटला.पालकांनी देखील उस्फूर्तपणे भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाला समिती अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांची पाहणी केली.सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मा.मुख्याध्यापक श्री लागू सर यांनीदेखील विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहून सर्वांना प्रोत्साहन दिले. 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स