- Events /
- शिवजयंती आणि गोळवलकर गुरुजी जयंती
शिवजयंती आणि गोळवलकर गुरुजी जयंती
गुरुवार,19 फेब्रुवारी 2026 रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिवजयंती आणि गोळवलकर गुरुजी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या आरतीने करण्यात आली. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. लागू सर यांच्या हस्ते शिवरायांच्या आणि गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी श्री.विवेक दातार सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रशालेतील शिक्षिका नेहाताई यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.लागू सर यांच्या हस्ते श्री.दातार सरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दातार सर यांनी शिवराज्याभिषेक प्रसंगाशी संबंधित बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी सादर केला.
याप्रसंगी प्रशालेत झालेल्या वाचन स्पर्धेच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिवजयंती सोबतच आज माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांचा देखील जन्मदिन आहे.त्यांच्या महान कार्याविषयीची माहिती प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.विकास दिग्रसकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयात सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यामध्ये माहिती, कथा,नृत्य यांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. सातवीतील विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक प्रतिनिधी सोनिया ताई यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री लागू सर यांनी सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी 'स्वयंशिस्तीचे पालन करावे असा मुख्याध्यापक श्री लागू सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना संदेश दिला.अशा पद्धतीने विद्यालयात शिवजयंती आणि गोळवलकर गुरुजी जयंती जोशात व उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More