- Events /
- तिसरी भास्कर परिपाठ 'स्वातंत्र्य दिन'
तिसरी भास्कर परिपाठ 'स्वातंत्र्य दिन'
शुक्रवार, दि. १४ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता तिसरी ‘भास्कर’ वर्गाचा 'स्वातंत्र्य दिन' या विषयावर विशेष परिपाठ ‘’ उत्साह व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असलेला हा दिवस. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून ते अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून, त्यागातून मिळालेले आहे हे 'जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले' या गीतातून मुलांनी व्यक्त केले. नंदुरबार मधील सोळा वर्षाच्या क्रांतिकारक शिरीष कुमार ची गोष्ट याप्रसंगी कु. नारायणी हिने सांगितली. स्वातंत्र्य मिळाले परंतु ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र आपली आहे हा संदेश'हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यावे' या गीतातून मुलांनी दिला. अवघ्या जगाला अध्यात्माचे महत्त्व पटवून देणारा, माणुसकीची शिकवण देणारा, नाविन्याची ध्यास धरणारा आपला भारत देश ‘सारे जंहा से अच्छा! आहे .
हे या देशाचे वर्णन असलेले 'जहाँ डाल डाल पर'या गीतावर मुलींनी उत्साहपूर्ण नृत्य सादरीकरणातून दाखविले. स्वातंत्र्य दिन हा फक्त एका दिवसापुरता साजरा करायचा नसून, देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याबरोबरच एक सजग नागरिक म्हणून आपली कोणती जबाबदारी आहे हे सांगण्यात आले. बलशाली व सुसंस्कृत भारत घडविण्यासाठी मी माझा नक्की खारीचा वाटा उचलीन अशी प्रतिज्ञा मुलांनी घेतली. परिपाठाची सांगता 'बलसागर भारत होवो'या गीताने झाली.
माननीय मुख्याध्यापक श्री लागू यांनी ‘स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न ते देश बलशाली होण्याचा प्रवास भारावून टाकणारा होता ‘असे मत व्यक्त केले.निवेदन करणाऱ्या, नृत्य करणाऱ्या तसेच समूहगीत आत्मविश्वासाने सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समूहगीतासाठी, तसेच नृत्यासाठी उत्तम गाणी निवडल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. परिपाठाची संहिता वर्गशिक्षिका सौ.रोहिणी कोहिणकर यांनी लिहिली.
परिपाठासाठी इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच चैतालीताई, शुभांगी पानसरे, राजश्री औटी, अंकिता निकंबे, सोनिया तांबेकर, स्नेहा खटावकर या शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More