प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • दहीहंडी -एकीची ताकद

दहीहंडी -एकीची ताकद

दहीहंडी -एकीची ताकद

शुक्रवार, दि. ०४/०९/२०२६ रोजी इयत्ता दुसरी मित्र वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘दहीहंडी’ या विषयावर विशेष परिपाठ सादर केला. सकाळच्या मंगलमय वातावरणात परिपाठाची सुरुवात गणपतीच्या श्लोकाने करण्यात आली. त्यानंतर भारतीय संस्कृतीतील श्रावण महिन्याचे महत्त्व सांगण्यात आले. श्रावण महिन्यात येणारे विविध सण व उत्सव सांगून विद्यार्थिनींनी श्रीकृष्णाची आरती नृत्य रूपात सादर केली . तसेच श्रीकृष्ण जन्मकथा व गोकुळाष्टमीचे महत्त्व , माखन चोर हे विद्यार्थ्यांनी उस्फूर्तरीत्या नाट्यमय स्वरूपात सादर केले. श्रीकृष्ण व सुदामा मैत्री याविषयी गोष्ट सांगून त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देण्यात आले. दहीहंडी उत्सवाची माहिती सांगण्यात आली आणि त्यानंतर दहीहंडीचे जोशपूर्ण नृत्य मुलांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व प्रभावीपणे सहभाग घेत हा परिपाठ उत्तमरीत्या सादर केला.

अतिशय कमी वेळेत उत्कृष्ट परिपाठ सादर केल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वासंती ताई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. या परिपाठाचे संहिता लेखन स्नेहाताई खटावकर यांनी केले. परिपाठासाठी योगिताताई, श्वेतांबरी ताई व प्राजक्ता ताई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे इयत्ता दुसरी ‘मित्र’ वर्गाचा विशेष परिपाठ सौ. वासंती ताई यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व उत्तमरीत्या पार पडला.

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स