- Events /
- ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
दिनांक २६ जानेवारी २०२६, सोमवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मातीच्या मैदानावर ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय व डी. ई. एस. या तिन्ही शाळांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अभिजीत येळगावकर तसेच कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पर्वती विभागाच्या नगरसेविका स्मिता वस्ते उपस्थित होत्या. तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, डी. ई. एसच्या शाला समिती अध्यक्षा राजश्री ठकार यांच्यासह तिन्ही शाळांमधील सर्व विभागांचे मुख्याध्यापक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक अभिजीत येळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून करण्यात आली. यानंतर ध्वजवंदना, ध्वज सलामी, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वज प्रतिज्ञा व भारताची प्रतिज्ञा घेण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्याने संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले तसेच साक्षरता प्रतिज्ञा घेण्यात आली.
आपल्या मनोगतात अभिजीत येळगावकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "शाळा केवळ पुस्तकी ज्ञान न देता मूल्यांची जडणघडण करतात, यशाचा पाया कष्ट व देशप्रेमावर उभा असतो." असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी देशाचे सक्षम नेतृत्व करून भारताला प्रथम क्रमांकावर न्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व क्रीडाप्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. “हे मातृभूमी जय हो” हे समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केले. तिसरी ते दहावी इयत्तेतील निवडक विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड करून ध्वजास मानवंदना दिली.न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनीने महिषासुरमर्दिनी स्तोत्रावर योगासनांचे प्रात्यक्षिक, तर माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, ससाधन कवायत सादर केली.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिलंबम, लेझीम यांची प्रात्यक्षिके सादर केली. डी. ई. एस. मुरलीधर लोहिया मातृमंदिरच्या तसेच डी. ई. एस. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य व मार्शल आर्टची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रस्ताविकातून सुनीता राव यांनी देशासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली. रामकृष्ण चिंचकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या वेळी तिन्ही शाळांमधील सर्व विभागप्रमुख व मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रवीण रांगोळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता संपूर्ण “वंदे मातरम्” ने करण्यात आली. हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा ठरला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More