प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • 'वंद्य वंदे मातरम्' प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन २०२५

'वंद्य वंदे मातरम्' प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन २०२५

'वंद्य वंदे मातरम्' प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन २०२५

दिनांक १९ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात प्राथमिक विभागातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी 'वंद्य वंदे मातरम्' हा अभिमानाने भारलेला देशभक्तीपर स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 

DRDO चे निवृत्त अधिकारी श्री. काशिनाथ दामोदर देवधर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या DRDO या प्रतिष्ठित संस्थेत दीर्घकाळ सेवा करताना त्यांनी तंत्रज्ञान,संशोधन व नवकल्पना यांचे महत्त्व प्रत्यक्ष आचरले.त्यांच्या याच गुणांनी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे लक्ष वेधले व त्यांनी तयार केलेल्या शस्त्राचा वापर कारगिल व यांसारख्या अनेक युद्धांमध्ये करण्यात आला. त्यांच्या संशोधन,तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रातील कार्यामुळे भारतीय बनावटीची शस्त्रे युद्धात वापरली गेली आणि आजही या शस्त्रांचा वापर आपल्या सैन्य दलात करून सीमा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे साकारत असताना त्यांना आलेले अनुभव कथन केले.भारताने आत्मनिर्भरतेला महत्त्व देऊन नौदल ,वायुदल व हवाई दल यांसाठी आधुनिक तंत्रांची शस्त्रास्त्रे तयार करून देशाची ताकद वाढवली त्याचे प्रत्यंतर 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जगाला पाहायला मिळाले, असे प्रतिपादन श्री. काशीनाथ देवधर यांनी केले. 

शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक प्रसाद लागू यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सुरुवात मंगल नांदीने झाली व वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर देशप्रेम जागवणारे "जहाँ डाल डाल पर" या गीताचे सादरीकरण झाले.यानंतर विद्यार्थ्यांनी संतांच्या विचारांवर आधारित "तुम्ही संत मायबाप" या गाण्यावर ताल धरत नृत्य सादर केले वातावरण भक्तिमय झाले. पुढे "शिवबाच नाव रं" व "मर्द मराठा" या नृत्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व मराठ्यांचा पराक्रम प्रभावीपणे सादर झाला. 

त्याचप्रमाणे "विजयी भव" या गीताने पराक्रमाचा जयघोष घुमला. पुढील सादरीकरणात क्रांतिकारकांच्या जाज्वल्य संघर्षाची आठवण करून देणारा भगतसिंगवरील सादरीकरण रंगले. त्यानंतर "उठा राष्ट्रवीर हो" या घोषणेसह विद्यार्थ्यांनी शिरीषकुमारांसह स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना आदरांजली वाहिली. "ए वतन" व "चरैवेति" यांद्वारे स्वातंत्र्योत्तर भारताची जिद्द व सतत पुढे चालत राहण्याचा संदेश देत सरकला. नंतर "भारत हमको जान से प्यारा है" व "ओ देश मेरे" सारख्या गीतांनी वातावरण देशभक्तीने भारावले. 

आजच्या काळातील भारतीय सेनेचे योगदान अधोरेखित करत "ऑपरेशन सिंदूर" संदर्भातील सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. यानंतर भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मुलाखतीद्वारे आधुनिक भारताचा दृष्टिकोन, विकास व दृढ निर्णयशक्ती याबद्दल थोडक्यात देशाला केलेले मार्गदर्शन दाखविण्यात आले.समारोपात "जय हो" गीताने जोश निर्माण झाला व कार्यक्रमाचा शेवट "वंदे मातरम्" या सामूहिक गायनाने अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने झाला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाण, कार्यशीलता व राष्ट्रप्रेम जागविणारा ठरला. 

या कार्यक्रमास माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास दिग्रसकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख वरदा पटवर्धन यांनी करून दिली. आभार सोनिया तांबेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संहिता लेखन शाळेतील शिक्षिका सोनिया तांबेकर यांनी केले होते. मुख्याध्यापक प्रसाद लागू यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांच्या सहकार्याने"वंद्य वंदे मातरम्" हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये इतिहासज्ञान, देशभक्ती, स्वाभिमान व प्रेरणा जागृत करण्यात यशस्वी ठरला. 

 

कार्यक्रम

  • गड शिवनेरी - इतिहासाची सुरुवात

    गड शिवनेरी - इतिहासा ...

    गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More

  • खंडेनवमी - शौर्य व शस्त्र पूजन

    खंडेनवमी - शौर्य व श ...

    दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More

  • त्रिवेणी-- विशेष परिपाठ

    त्रिवेणी-- विशेष परि ...

    गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More

  • देवी आराधना -नवरात्र

    देवी आराधना -नवरात्र ...

    ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More

  • सहभागाचा नवा अध्याय -शिक्षक दिन

    सहभागाचा नवा अध्याय ...

    या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स